अपघातग्रस्त व्यक्तीचा तुटलेला पाय उशी म्हणून दिला

1013

दिल्लीतील बडखल येथील रेल्वे क्रॉसिंगवर  नवी दिल्ली व मुंबई सेंट्रल एक्सप्रेसने धडक दिल्याने एका व्यक्तीचे दोन्ही पाय कापले गेले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात स्ट्रेचरवरून नेत असताना स्थानिक रुग्णालयातील नर्सेसनी  त्याचेच तुटलेले पाय त्याला उशी म्हणून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर व नर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्या व्यक्तीचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

शनिवारी सकाळी भूड कॉलनीमध्ये राहणारे प्रदीप (42) कामाला जायला निघालेय त्यावेळी बडखल येथील रेल्वे क्रॉसिंग पार करत असताना त्यांना एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय कापले गेले. त्यानंतर त्यांना बी के सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे नेत असताना अॅम्ब्यलन्समधील नर्सने त्यांचे तुटलेले पाय त्यांच्या डोक्याखाली उशीसारखे ठेवले होते. गंभीर जखमी असलेल्या प्रदीप यांना नंतर ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या