लग्नामध्ये मानसी नाईक दिसणार ऐश्वर्याच्या जोधा अकबर लूकमध्ये, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मानसी नाईक येत्या 19 जानेवारीला तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या मानसीची जोरदार शॉपिंग सुरू आहे. तिच्या चाहत्यांना देखील लग्नात ती कशी दिसेल याची उत्सुकता लागली आहे.

मानसी नाईक हिला मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या राय म्हटले जाते. तिचा लूक देखील काहीसा ऐश्वर्या सारखा आहे. त्यामुळेच कदाचित मानसीने तिच्या लग्नात ऐश्वर्याचाच एक लूक फॉलो करायचे ठरवले असावे. नकतंच टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या मुलाखतीत मानसीने याबाबत सांगितले आहे. मानसी नाईक ही जोधा अकबरमधील ऐश्वर्यासारखीच तिच्या लग्नात तयार होणार आहे. ‘ऐश्वर्या ही माझी आवडती अभिनेत्री आहे. ती जशी जोधा अकबरमध्ये त तयार झाली होती तसे तयार होणे हे माझे स्वप्न आहे. मी जरी महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न करत असले तरी आम्ही लग्न राजेशाही पद्धतीच करणार आहोत’, असे मानसीने या मुलाखतीत सांगितले.ो

19 जानेवारीला मानसीचे प्रदीपसोबत लग्न होणार असून त्यानंतर ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत. मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार असून त्यानंतर फरिदाबादला प्रदिपकडच्या काही विधी पार पडणार आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने यांच्या लग्नाला देखील जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. मानसी व प्रदीप यांचा 10 नोव्हेंबरला साखरपुडा पार पडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या