…अखेर ‘तो’ आला!!

14
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

कोकणात शनिवारी मान्सूनच्या आगमनानं कोकणवासीय सुखावले होते. त्यातच कालपासून मुंबईकरतही वेशीवर येऊन ठेपलेल्या पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते. आज अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. रविवारी सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे.

पुढील २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला होता. मच्छिमारांना देखील समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी महाराष्ट्रात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलास मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या