माफी मागणार नाही..चुकीचे काही बोललो नाही, त्रिशा कृष्णन आक्षेपार्ह विधानाबाबत मन्सुर खानचे वक्तव्य

दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ‘लियो’मधील अभिनेता मन्सुर अली खान चर्चेत आला आहे. त्याच्यावर चहूबाजूने टिका होत आहे, अशातच मन्सुर अली खान यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या विधानाबाबत माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मन्सूर अली खान यांनी आज चेन्नई येथे पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी सांगितले की, मी माझ्या विधानासाठी माफी मागणार नाही. पत्रकार परिषदेनंतर चित्रपट संस्था नादिगर संगमने त्यांच्या आक्षेपार्ह विधानासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंदी घातली आहे . त्यांच्या चूक लक्षात आल्यावर आणि माफी मागितल्यावरच बंदी काढली जाईल. मन्सूर अली म्हणाले, “नादिगर संगमने तात्पुरती बंदी घालून चूक केली आहे. जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा त्यांनी माझ्याकडून खुलासाही मागितला नाही. त्यांनी मला एकदा फोन करायला हवा होता किंवा बोलावून स्पष्टीकरण मागायला हवे होते किंवा नोटीस बजावायला हवी होती. बाकी चौकशी व्हायला हवी होती पण तसे काहीच झाले नाही.

नादिगर संगमला मी चार तासांचा अवधी देतो. त्यांनी माझ्याविरुद्ध केलेले वक्तव्य मागे घ्यावे. तो म्हणाले की, मी माफी मागावी. मी माफी मागणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? मीडिया माझ्या विरोधात वाट्टेल ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे.पुढे तो म्हणाले, सिनेमामधील बलात्काराचा सीन काय असतो, त्याचा अर्थ तो बलात्कार खरा असतो? सिनेमात मर्डर दाखवतात ते काय असते? याचा अर्थ ते त्यांचे खरेच मर्डर करतात? तुमच्याकडे काही सेन्स नाही का? मी काही चुकीचे बोललो नाही त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचे त्याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये मन्सूर अली खानने त्रिशासोबतचा रेप सीन चित्रपटात न घडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते. इतर नायिकांप्रमाणे तो तिला बेडरूममध्ये घेऊन जाऊ शकत नव्हता. तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही.” त्यांच्या वक्तव्यानंतर त्रिशा कृष्णनने त्यांच्या पोस्टवर संताप व्यक्त करत यापुढे काम करणार नसल्याचे सांगितले. शिवाय चिरंजीवीसोबतच इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स त्रिशाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.