‘ही’ सौंदर्यवती साकारणार पृथ्वीराज चौहान यांची ‘संयोगिता’

गेला काही काळ बॉलिवूडमध्ये पीरियड ड्रामा नावाचा ट्रेंड चांगलाच हिट होताना दिसत आहे. बाहुबलीपासून ते आगामी पानिपतपर्यंत अनेक चित्रपटांचं उदाहरण देता येईल. पानिपत वगळता यातील बहुतांश चित्रपट तिकीटबारीवर तुफान गाजले आहेत. आता यात अजून एका चित्रपटाची भर पडताना दिसत आहे.

हा चित्रपट थोर राजपूत योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकथा आणि पृथ्वीराजची शौर्यकथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. दूरदर्शनच्या चाणक्य या मालिकेचे दिग्दर्शक, पिंजर आणि मोहल्ला अस्सी सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे चंद्रप्रकाश द्विवेदी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान ही भूमिका साकारणार आहे.

manushi-chhillar-1

या चित्रपटात एक सौंदर्यवती बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती दुसरी तिसरी कुणीही नसून मिस वर्ल्ड 2017 ठरलेली मानुषी छिल्लर असणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून ती या चित्रपटासाठी घोडेस्वारी आणि तत्सम स्टंटसाठी प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटाविषयी मानुषी अत्यंत उत्सुक असून संयोगितासारखी धाडसी राजकन्या साकारणं हे तिच्यासाठी स्वप्नवत असल्याचं मनोगत तिने व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या