‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये मानुषी छिल्लर

आगामी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मानुषी छिल्लर दिसणार आहे. विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबत ती स्क्रीनवर झळकेल.  ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याचे ट्रेलरवरून कळतंय. यामध्ये मानुषी सशक्त स्त्राrच्या भूमिकेत दिसेल. मानुषी आणि विकीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहता येईल. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. ही यशराज फिल्म्सची निर्मिती असून प्रीतमने संगीत दिले आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ चित्रपट 22 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.