आरोग्यदायी ‘बडीशेप’चे अऩेक फायदे, जाणून घ्या !

जेवणानंतर विशेषत: मांसाहारानंतर मुखशुद्धीकरिता बडीशेप खावीशी वाटते. बडीशेपच्या या छोट्या छोट्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणांचा साठा आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जीवनसत्त्व ए आणि सी ही तत्त्वे बडीशेपमध्ये आहेत. तसेच पोटाचे विकार असणाऱ्यांकरिता बडीशेप गुणकारी आहे. पाहूया बडीशेपचे इतरही काही औषधी गुणधर्म.

जे लोकं बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याकरिता प्रयत्न आहेत. त्यांच्याकरिता बडीशेप हा रामबाण उपाय सांगितला आहे. कारण बडीशेप खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. कॅलरी वेगाने बर्न होतात. यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

आयुर्वेदात पोटाचे विकार हेच अऩेक आजारांचे कारण आहे, असे सांगितले आहे. पचनविकाराशी संबंधित विविध आजार बडीशेप खाल्ल्याने बरे होतात. नियमित बडीशेप खाल्ल्याने डायजेशन सिस्टिम सुधारते. मूळव्याध, अॅसिडिटी, गॅस होणे आणि बद्धकोष्ठता असे अनेक त्रास दूर व्हायला मदत होते.

काही जणांना शांत झोप लागत ऩाही, अनिद्रेचा त्रास असतो. चांगल्या झोपेकरिता मेलाटोनीन हार्मोनची गरज असते. बडीशेपमुळे मेलाटोनीन स्त्राव शरीरात स्त्रवायला सुरुवात होते आणि शांत झोप लागते.

मासिक पाळीच्या वेळी काही महिलांना पोटदुखीचा खूप त्रास होतो. अशावेळी बडीशेपचे पाणी प्यावे. यामुळे पोटदुखी बरी होऊन गॅसेसची समस्याही सुटते.

बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते यामुळे उच्च रक्तदाब आणि हार्ट रेट नियंत्रणात राहतो.

बडीशेपमधील फायबरमुळे पोटाचे आजार दूर होऊन शरीरातील टॉक्सीन (विषद्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात.

जेवणानंतर बडीशेप खाल्ली तर पचन चांगले होते. काळे मीठ, जीरे, बडीशेप एकत्र चूर्ण करून कोमट पाण्यात घ्यावे. पचनक्रियेसाठी उत्तम चूर्ण आहे. उलटीचा त्रास होत असल्यास बडीशेप खावी. तात्काळ आराम मिळतो.

बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचं काम करते. नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यात मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होते.

बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवून झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दुधात घालून प्यायल्यास दृष्टी सुधारायला मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या