बोंडअळीच्या नुकसान भरपाईतून जिल्ह्यातील २१ मंडळे वगळली

20

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

३३ टक्क्यांचा निकष लावल्यामुळे जिल्ह्यातील ६२ पैकी २१ मंडळांतील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईतून वगळण्यात येणार आहे. राज्यातील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली होती. ही रक्कम आता या २१ मंडळांतील हजारो शेतकऱ्यांना मिळणार नाही.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंडअळीने मोठ्या संकटात टाकले आहे. बोंडअळीने केलेल्या हल्ल्यामुळे लाखो हेक्टरवरील कापूस पीक उद्ध्वस्त झाले. बोंडअळीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी बियाणे विक्रेत्या कंपनीवर गुन्हे दाखल केले आहेत. शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हेक्टरी ६,८०० रुपये बियाणे कंपनी व विमा कंपनी यांची मिळून जवळपास हेक्टरी ३७ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.

सरकारने बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने घाईगडबडीने पंचनामे केले होते. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालात कापूस लागवडीचे क्षेत्र व पंचनाम्यानंतर समोर आलेले पेरणी क्षेत्र या दोघांमध्ये मोठी तफावत होऊन जवळपास १ लाख हेक्टरवरून अधिक वाढीव क्षेत्र दाखविण्यात आले होते. हा अहवाल केंद्राच्या एनडीआरएफकडे मदतीसाठी पाठविण्यात आला होता.

केंद्राने हा अहवाल फेटाळून लावला. यानंतर राज्य सरकारने तात्काळ बैठक घेऊन आणि ज्या मंडळात शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे, केवळ अशांनाच नुकसानभरपाईस पात्र ठरवून त्याचा अहवाल पाठविण्यास सांगितले. महसूल विभागाने नुकतीच ही आकडेवारी राज्य सरकारला पाठविली असून, त्यात संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ६२ मंडळांपैकी २१ मंडळांची टक्केवारी ही ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे २१ मंडळांतील हजारो शेतकरी बोंडअळीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. घोषणा करून पंचनामे करण्याचे आदेश दिले.

सरकारने बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने घाईगडबडीने पंचनामे केले होते. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालात कापूस लागवडीचे क्षेत्र व पंचनाम्यानंतर समोर आलेले पेरणी क्षेत्र या दोघांमध्ये मोठी तफावत होऊन जवळपास १ लाख हेक्टरवरून अधिक वाढीव क्षेत्र दाखविण्यात आले होते. हा अहवाल केंद्राच्या एनडीआरएफकडे मदतीसाठी पाठविण्यात आला होता.

केंद्राने हा अहवाल फेटाळून लावला. यानंतर राज्य सरकारने तात्काळ बैठक घेऊन आणि ज्या मंडळात शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे, केवळ अशांनाच नुकसानभरपाईस पात्र ठरवून त्याचा अहवाल पाठविण्यास सांगितले. महसूल विभागाने नुकतीच ही आकडेवारी राज्य सरकारला पाठविली असून, त्यात संभाजीनगर जिल्ह्यातील एवूâण ६२ मंडळांपैकी २१ मंडळांची टक्केवारी ही ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे २१ मंडळांतील हजारो शेतकरी बोंडअळीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.

sambhajinagar-bondali

आपली प्रतिक्रिया द्या