घुसखोरीचा डाव उधळला; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

29

सामना ऑनलाईन । श्रीनगर

रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. तंगधर सेक्टरमधून जम्मू-कश्मीरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव हिंदुस्थानी जवानांनी उधळला. पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

रमजान महिन्यात जम्मू-कश्मीरात लष्कराचे ऑपरेशन थांबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, मात्र पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांमध्ये वाढच झाली आहे. शनिवारी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. शुक्रवारी रामबन जिल्हय़ात लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते. तसेच मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. एके-४७ रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल, काडतुसे जप्त केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या