मीरा-भाईंदर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि शिवसेना महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना घराघरात पोहोचवण्याचा निर्धार या महिला कार्यकर्त्यांनी केला.
मीरा-भाईंदरच्या नवनिर्वाचित जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली वज्रमूठ भक्कम करण्यासाठी महिला आघाडीने जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीची भक्कम बांधणी सुरू आहे. मीरा रोड, गोल्डन नेस्ट येथील राजन विचारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात लता शिरोळे, वैष्णदेवी जगरल, शकुंतला यादव, मीरादेवी सहा, सुनीतादेवी सहा, समुद्रा पाल, प्रीती माने, लक्ष्मी राऊत, सविता धावडे, सरोज सिंग यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
उपजिल्हाप्रमुख जयराम मेसे, उपजिल्हा संघटक अनिता रहाळे यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे सदानंद घोसाळकर, विभागप्रमुख शेखर पाटील, शहर संघटक मनीषा भोपळे, उपशहर संघटक उषा उगाडे, शीतल जाधव, विभाग संघटक आशा देढे आदी उपस्थित होते.