मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक लोंढे शिवसेनेत

967

अखिल भारतीय मराठा महासंघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष त्र्यंबक लोंढे यांनी आज सोमवारी मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

पंधरापेक्षा अधिक वर्षाहुन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या त्र्यंबक लोंढे यांनी सहकाऱ्यांसह हिंगोली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी गेली दहा वर्ष सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते लोंढे यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, डी.के. दुर्गे, राम कदम, उपसभापती गोपु पाटील, मयुर शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या