शिवाजी महाराजांमुळेच जवानांना ऊर्जा मिळते – लेफ्टनंट जनरल पन्नू

6893

छत्रपती शिवाजी महाराजांपासून जवानांना ऊर्जा, प्रेरणा मिळते त्यामुळेच जवान सीमेवरील शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज असतात. शिवाजी महाराज आमच्या रेजिमेंटचे आदर्श आहेत, असे गौरवोद्गारर ‘मराठा रेजिमेंट’चे कर्नल ऑफ दि रेजिमेंट पी.जे.एस. पन्नू यांनी काढले आहेत. तसेच हिंदुस्थानी सैन्याला पराभूत करेन असा शत्रू अजून जन्माला आलेला नाही. शत्रू लढाईसाठी आव्हान देईल याची आम्ही प्रतिक्षा करत असतो, असेही ते म्हणाले. मराठा सेटरमधील मराठा सेंटरचे इतिहास सांगणाऱ्या म्यूझीयमचे उद्घाटन लेफ्टनंट जनर पन्नू यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांनी बोलताना त्यांनी वरील विधान केले.

पाहा संपूर्ण व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या