मराठा आरक्षण- 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात सरकारी नोकऱया आणि शिक्षणात मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या पीठाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात खंडपीठात न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्या. अजय रस्तोगी, न्या. हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या