मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे आणि अशोक चव्हाण यांची बैठक, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

1240

मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांची आज विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याबाबत राज्य सरकारच्या तयारीची माहिती दिली व पुढील रणनितीबाबत विचारविनिमय झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही. यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थी आणि राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी 27 जुलैपासून तीन दिवस अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे निकाल 30 जुलैदरम्यान येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेल्या आरक्षणाला आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती एन. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 27 जुलैपासून नियमित घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी सरकार आणि याचिकाकत्र्यांनी यावर किती वाद घालायचा हे ठरवून घेतले पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या