मराठा आरक्षण आंदोलन : उपसभापती सुशील सोळंके यांचा राजीनामा

सुधीर नागापुरे । माजलगांव

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ येथील बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सभापती अलका नरवडे व गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला. बीड जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील हा पहिला राजीनामा ठरला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने होत आहेत. या आंदोलनात दोन मराठा बांधवांचे बलीदानही गेले आहे, असे असतांनाही शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची समाजभावना निर्माण झाली आहे. याचा निषेध आणि समाजाच्या मागणीला समर्थन म्हणून माजलगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे उपसभापती सुशील सोळंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे समर्थक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या