आम्ही खवय्ये – चिरतरुण अभिनेता सुनील बर्वे.

22
 • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – आपल्याला आवडेल ते खाणं. अन्न हे मी नेहमी औषधाप्रमाणे समजतो आणि खातो.
 • खायला काय आवडतं? – शाकाहारी सगळे पदार्थ खायला आवडतात.
 • चमचमीत की साधं? – साधं.
 • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – आवश्यक तेवढे खातो. उगाचच चव लागली म्हणून जास्त खात नाही.
 • डाएट करता का? – डाएट करत नाही, आवश्यक तेवढेच खातो.
 • आठवड्यातून किती वेळा बाहेर खाता? – पंधरा दिवसांतून एकदा बाहेर खातो. विशेष म्हणजे आमचं क्षेत्रच असं आहे की, कामानिमित्त बाहेर खाणं होतं. कुटुंबाबरोबर बाहेर खायला गेलोय असं दोन महिन्यांतून एकदा होतं.
 • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – साई व्हेज वर्ल्ड हॉटेलमध्ये जायला आवडतं.
 • कोणतं पेय आवडतं? – दुग्धजन्य पेय, चहा, कॉफी आवडते.
 • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – थोडय़ा थोडय़ा वेळाने काहीतरी खातो. बिस्कीट किंवा इतर काही पदार्थ. मला जेवायला साग्रसंगीत लागतं असे काही नाही. प्रयोगाच्या वेळी मी वडापाव खाल्ला तरी चालतं. मग रात्री घरी आल्यावर वरणभात खातो किंवा दूधही घेतो. प्रयोगानिमित्त बाहेर गेल्यावर आमचं जेवण कधी कधी उशिराही होतं. तेव्हा प्रयोगाच्या आधी सॅण्डवीचसारखे काही पदार्थ खातो आणि प्रयोगानंतर जेवतो.
 • दौऱयानिमित्त गेल्यावर तिथे आवडलेल्या एखाद्या खास पदार्थाची आठवण – पूर्वी कोकणात किंवा इतर ठिकाणी प्रयोगानिमित्त जास्त दौरे व्हायचे. आता नाटकांच्या दौऱ्यांचं प्रमाण कमी आहे. तरीही ज्या हॉटेलमध्ये आमरस पोळी मिळेल तिथे जायला आवडतं. कोल्हापूरला गेलो की मिसळ खातो, पुण्याला गेलो की जनसेवामध्ये जेवतो.
 • स्ट्रिट फूड आवडतं का? – हो, पाणीपुरी खूप आवडते.
 • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – वरणभात, पोळी-भाजी.
 • जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – माझी बायको सुगरण आहे. ती जे उत्तम बनवते ते पाहुण्यांना खाऊ घालते. कधीतरी ती वेगळ्या पद्धतीचं सलाड किंवा स्टार्टर बनवते. जेवणात वेगळेपणा असतोच.
 • उपवास करता का? – हो, संकष्टी करतो.
आपली प्रतिक्रिया द्या