Video- तू चाल पुढं, तुला भीती कशाची! कोरोना योद्ध्यांना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा

1861

कोरोना व्हायरससारख्या भयंकर संकटाला आज संपूर्ण देश एकजुटीने सामोरा जात आहे. या लढाईत स्वतःच्या जिवाची बाजी लावून कोरोनाला रोखून धरणारे आणि तो नष्ट व्हावा यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्यांसाठी आज सर्वांच्याच मनात आदराची आणि अमाप कृतज्ञतेची भावना आहे.

हीच भावना व्हिडीओच्या माध्यमातून मराठी कलाकारांनी सादर केली आहे. समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या व्हिडीओतून अनेक मराठी कलाकारांनी कोरोना युद्धात माणुसकीच परमकर्तव्य मानणाऱ्या योद्ध्यांना मानाचा मुजरा केला आहे. या व्हिडीओत अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, चिन्मय मांडलेकर, आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, अभिनय बेर्डे, गश्मीर महाजनी, प्रियदर्शन जाधव, जसराज जोशी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, मृण्मयी देशपांडे, वैदेही परशुरामी, श्रेया बुगडे, अनिता दाते, मिथिला पालकर, शिवानी सुर्वे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सायली संजीव, हृता दुर्गुळे अशी कलाकारांची मांदियाळी आहे.

मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची या गाण्यावर कोरोना युद्धात अग्रस्थानी लढणाऱ्या पोलीस, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कामगार, समाजसेवी संस्था, पालिकेचे स्वच्छता विभागाचे इतर कर्मचारी, प्राणिप्रेमी संस्था, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी, पत्रकार या सर्वांना या कलाकारांनी सलाम केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या