‘या’ मराठी अभिनेत्रीनेचा साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सध्या काही काळ मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचा मोसम सुरू आहे. अनेक मराठी कलाकारांकडून गोड बातम्या ऐकायला मिळत आहेत. शर्मिष्ठा राऊत, सोनाली कुलकर्णी यांच्यानंतर आता अजून एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं लग्न ठरल्याचं वृत्त आहे.

ही अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. लगोरी, तुला पाहते रे, खुलता कळी खुलेना आणि आता रंग माझा वेगळा या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिज्ञा काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता तिने आपल्या नात्याला अजून एका गोड वळणावर न्यायचं ठरवलं आहे. नुकताच तिने तिचा प्रियकर मेहुल पै याच्यासोबत एका खासगी समारंभात साखरपुडा केला. या साखरपुड्याची माहिती तिनेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


View this post on Instagram

Always grateful❤️ #myforever

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

अभिज्ञा भावे हिचा पहिला विवाह वरुण अतीतकर यांच्याशी झाला होता. पण काही कारणाने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनयाव्यतिरिक्त अभिज्ञा ही व्यावसायिक असून तिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यासोबत तेजाज्ञा नावाचा साडीचा ब्रँडही बनवला आहे.


View this post on Instagram

माझा साखरकारखाना❤️❤️ #goodthingstaketime #amour #bestdayofmylife❤️

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

 

आपली प्रतिक्रिया द्या