रंगभूमी  आणि स्टुडिओ

48

चमत्कार निसर्गाचे आहेत. आपण आणि निसर्ग यांच्या एकत्रीकरणातून काही गोष्टी घडत असतात. याविषयी सांगतेय अभिनेत्री नेहा जोशी.

> देव म्हणजे? : निसर्ग आणि त्याची शक्ती. काही देव, काही शास्त्र्ा तर काहीजण निसर्गाचा चमत्कार म्हणतात.

> आवडते दैवत? : काम

> धार्मिक स्थळ? : नाटकाचं थिएटर आणि चित्रीकरणाचं ठिकाण

> आवडती प्रार्थना : मी जे काही काम आयुष्यात करतेय ते प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करावं आणि ते करण्याची शक्ती मला मिळावी.

> आवडते देवाचं गाणं?: ‘प्रथम तुला वंदितो’, ‘ओम नमोजी आद्या’

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? : चमत्कार निसर्गाचे आहेत. आपण आणि निसर्ग यांच्या एकत्रीकरणातून काही गोष्टी घडतात.

> आवडता रंग? : निळा

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? : उत्तम काम केल्यावर आणि एखाद्या माणसाशी चार शब्द चांगले बोललं की, समाधान मिळतं.

> दुःखी असतेस तेव्हा? : दुःखाच्या पहिल्या भरात रडू येतं किंवा कोणाशी तरी बोलावसं वाटतं. पहिला भर ओसरल्यावर हे दुःख नेमकं कशामुळे आलेलं आहे याचा विचार करते. त्याला मी कारणीभूत असेन तर मी माझ्यात काय बदल किंवा योग्य काय करायला हवं होतं.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील? : नास्तिक लोकांची भूमिका समजून घ्यायला हवी. समाजातील लोक देव देव करत असतानाही जे देव नाही असे म्हणतात ते का याचा विचार व्हायला हवा.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुझं मत काय? : प्रत्येकाचा देव वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतो.

> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालतेस? : अभिनय म्हणजे परकाया प्रवेश असतो. तिच्यावर विश्वास ठेवून तिचं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करणं ही भक्ती आहे. कारण पूर्ण विश्वास ठेवला नाही तर ती साकारता येणं कठीण.

> मूर्तीपूजा महत्त्वाची की प्रार्थना? : प्रार्थना. ध्यान किंवा चिंतन करणं महत्त्वाचं.

आपली प्रतिक्रिया द्या