कोरोना लढ्यात सोनाली कुलकर्णीचा खारीचा वाटा, वाढदिवसानिमित्त रुग्णालयाला दिल्या 95 PPE किट्स

955

महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिने आज तिच्या वाढदिवसानिमित्त वायसीएम रुग्णालयाला 95 PPE किट्स दिल्या. सोनाली हिचे वडील मनोहर कुलकर्णी, भाऊ अतुल कुलकर्णी व कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी रुग्णालयाचे डीन डॉक्टर राजेंद्र वाबळे व भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून PPE किट्स सुपूर्त केले.

देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू आहे. सोनाली कुलकर्णी सध्या दुबई येथे अडकल्यामुळे ती प्रत्यक्ष येऊ शकली नाही. परंतु वाढदिवसानिमित्त जे खरे वॉरियर्स आहेत त्यांचे रक्षण व्हावे या हेतूने मी हे किट देत आहे, असे सोनालीने सांगितले.

save_20200518_152616

‘मी पिंपरी-चिंचवडची रहिवासी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सध्या कोरोना काळामध्ये अत्यंत चांगले काम करत असून वायसीएम हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंटची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे, असे सोनाली म्हणते. तसेच माझ्या सहकारी कलाकार यांनीही यासाठी मला मदत केली आहे’, असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या