राज्यभरात मायमराठीचा गजर

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत साजऱया करण्यात येणाऱया मराठी भाषा दिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध शाळा, सामाजिक संस्था तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविता वाचन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   

 वर्सोवा विधानसभा शाखा क्रमांक 59 60च्या वतीने मराठी गीतांच्या कार्यक्रम  उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. ‘स्वरगंधच्या नचिकेत देसाई, योगिता बर्वे चितळे, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला विधानसभा संघटक शैलेश फणसे, समन्वयक बाळा आंबेरकर, माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच महिला समन्वयक शीतल सावंत, शाखाप्रमुख सिद्धेश चाचे, सतीश परब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख राजेश शेटय़े यांनी केले.

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालाड विधानसभा आणि प्रज्ञा प्रबोधन शिवस्नेही संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन विभागप्रमुख अजित भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक विधानसभा प्रमुख अशोक पटेल, हरिश्चंद्र राणे, प्रभाकर देसाई, विजय मांडाळकर, मा. शाखाप्रमुख किरण केणी, समन्वयक विकास दशपुते, शिक्षिका शुभदा नाईक प्रवीणा वाडेकर, हर्षदा राऊत, रोहिणी सावे, नीलम माने व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत मराठी दिवसमोठय़ा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शाळेत कविता वाचन, गाणे, क्रॉसवर्ड, कोडी सोडवणे आणि मेमरी गेम्स यांसारख्या उपक्रमांचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक मराठी वेशभूषा परिधान केली होती.

 मराठी राजभाषा दिनानिमित्त मरोळ प्रागतिक मराठी हायस्कूलतर्फे भव्य दिंडी काढण्यात आली. मरोळ प्रागतिक शाळा कदमवाडी ते अंधेरीकुर्ला रोडपर्यंत दिंडी निघाली होती. याप्रसंगी मोठय़ा संख्येने शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक माजी नगरसेवक सुभाष सावंत, स्मिता सावंत, मुख्याध्यापक उषा बामणे, शेलार मॅडम उपस्थित होते.

 धारावी येथील महात्मा फुले शिक्षणसंस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कविता, सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमात महात्मा फुले शिक्षणसंस्था अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने, सचिव दिलीप शिंदे, खजिनदार प्रमोद सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर, स्वाती होलमुखे, मनोहर जोशी कॉलेज प्रिन्सिपल कमलेश सोनपसारे सहभागी झाले होते.

 जोगेश्वरीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी पालखीतील ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, माजी नगरसेवक बाळा नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभाग संघटक प्रियंका आंबोळकर, महेश गवाणकर आदी उपस्थित होते