आळंदी एमआयटीत ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

आळंदी येथील एम.आय.टी. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळंदी येथील ग्रंथालय विभाग, विद्यार्थी विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने गूगल मीट प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यानिमित्त बीबीए (सीए) विभागातील प्राध्यापक डॉ. विकास नाना महांडूळे याचे व्याखान आयोजित करण्यात आले होते.

या व्याख्यानात मराठी भाषेची महती आणि आधुनिक जगांत मातृभाषा किती महत्वाची आहे, याचे महत्त्व सांगण्यात आले. आजच्या युवकांनी मातृभाषा आचरणात आणली पाहिजे, या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. महाविद्यालयाच्या उपप्राचर्य प्राध्यापिका अक्षदा कुलकर्णी यांनी आपल्या अनोख्या शैलीत मरठी भाषा कशा पद्धतीने समृद्ध होत गेली आणि मातृभाषेचे मानवी जीवनात असलेले महत्त्व सांगितले. राष्ट्रीय मतदान दिन विविधा उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. श्रीराम कारगावकर यांनी सांगितले. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे बजाविले पाहिजे असे सांगितले.

यावेळी प्रकल्प संचालक विजयखोडे, प्राचार्य डॉ.बी.बी. वाफारे, डॉ .मानसी अतितकर , कुलसचिव संदीप रोहीन्कर, महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास ग्रंथपाल प्रा. राहुल बाराथे , वि. कल्याण अधिकारी डॉ मंगेश भोपेळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. श्रींराम कारगावकर, सुनिता साबळे , सारिका पडवळ, निलेश मते, मधुकर वाखारे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राध्यापिका आर्चना आहेर यांनी केले. आभार ग्रंथपाल प्रा. राहुल बाराथे यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या