‘भिकारी’चं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

21

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याच्या ‘भिकारी’ या सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आपल्या चॉकलेट बॉय इमेजला छेद देत तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याचा या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

‘भिकारी’ हे नाव कानावर पडल्यावर पहिली प्रतिमा उभी राहते ती मळलेले कपडे, खाण्याची परवड, चेहरा-शरीर सुकलेले, डोळे खोल गेलेले. मात्र सिनेमाच्या पोस्टरमध्ये गणपती बाप्पाच्या रोडवर काढलेल्या रांगोळीच्या बाजूला सुटात झोपलेला स्वप्नील जोशी पाहिल्यानंतर सिनेमात नक्कीच काही भन्नाट कल्पना आहे, याची चाहूल लागते.

हा सिनेमा ४ ऑगस्ट रोजी पदर्शित होणार असून सिनेमाचे पोस्टर मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या