‘पल्याडवासी’ सज्ज

65

धाराशीवमधील पारधी समाजावर आधारलेला ‘पल्याडवासी’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. भटक्या समाजासाठी शासन दरबारी, कागदोपत्री अनेक उपक्रम असले तरी या समाजापर्यंत ते पोहोचतच नाहीत. एका समाजाला न्याय देणारा असा हा चित्रपट आहे. प्रगती कोळगे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाबरोबरच निर्मितीही केली आहे. सुमन कोळगे यांनी यात सहकार्य केले आहे.

कथा, पटकथा, संवाद, गीत, गायन याबरोबरच चिंदीची प्रमुख भूमिकाही प्रगती कोळगे हिनेच साकारली आहे. शिवाय विश्वनाथ काळे, अभिषेकसिंह हरेर, सोहन कांबळे, विशाल देशमुख, प्रतिक हंगे, विशाल साखरे, कुणाल पवार, मनोज यादव, आकाश बनसोडे, कार्तिक माने, मुकुंद जाधव, रवीकिसन शर्मा, अलोक शिंदे, आकाश बनसोडे यांच्याही यात भूमिका आहेत. हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.

आपली प्रतिक्रिया द्या