कॉमेडी हुंटाश लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सामना ऑनलाईन ।  मुंबई

आजच्या मराठी सिनेमांची निखळ मनोरंजन ही गरजच बनली आहे. म्हणूनच विनोदाच्या अंगाने जाणारे सिनेमे काही ठरावीक अंतराने बनतच असतात. नक्षत्र मुव्हीज प्रस्तुत आणि अपर्णा प्रमोद व अच्युत नावलेकर निर्मित ’हुंटाश’ हा सिनेमा त्याच पठडीतला… अंकुश ठाकूर यांनी दिग्दर्शन दिलेल्या या सिनेमाच्या ध्वनीफितींच्या प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, संजीवनी जाधव, नीला गोखले आणि किशोर नांदलस्कर यांच्या यात प्रमुख भूमिका पाहायला मिळतील. सोबतच प्रियंका पुळेकर ही नवोदित अभिनेत्रीही यात चमकणार आहे. अंकुश ठाकूर यांनी दिग्दर्शनाबरोबरच या सिनेमात नायकाची प्रमुख भूमिकाही साकारली आहे.

या सिनेमाच्या म्युझिक लाँचला खासदार आनंदराव अडसुळ, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि प्रसिद्ध उद्योगपती चंद्रकुमार जजोदिया यांच्यासह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. १० नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात एकूण ४ गाणी असून ती प्रणीत कुलकर्णी व अंकुश ठाकूर यांनी लिहिली असून प्रकाश प्रभाकर यांनी त्याला संगीत दिलंय.

आपली प्रतिक्रिया द्या