‘दशक्रिया’ चित्रपटाला आता ब्राह्मणमहासंघाचा विरोध

सामना प्रतिनिधी । पुणे

‘पद्मावती’ चित्रपटापाठोपाठ आता ‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. हा चित्रपट ब्राह्मणांची व हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी करणारा असून त्याच्या प्रदर्शनास मनाई करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या ’दशक्रिया’ या कादंबरीकर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगानं अनेक जुनाट बाबींवर चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यामुळं वादळ उठलं आहे. ब्राह्मण महासंघानं या चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. आपल्या वडिल धाऱ्यांच्या मागे विधी करण्याची पध्दत सर्वच धर्मात आणि समाजात आहे. परंतू केवळ हिंदू धर्मीय परंपरेलाच टीका करण्याचा हा प्रयत्न आम्ही खपवून घेणार आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरवणारा असून सेन्सॉर बोर्डानं त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी महासंघानं केली आहे. याच मुद्द्यावर महासंघाचे आनंद दवे आणि प्रतिनिधींनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या