‘जेता’ येतोय भेटीला !

असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱया विजेत्याची कहाणी सांगणारा ‘जेता’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘जेता’चा उत्साहवर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नीतिश आणि स्नेहल या जोडीसोबत चित्रपटामध्ये शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम, दीपक टावरे, प्रवीण इंदू, गौतम शिरसाठ, श्रेया कुलकर्णी आदी कलाकारही दिसणार आहेत. ‘जेता’चे दिग्दर्शन योगेश महाजन यांनी केले आहे तर संजय यादव यांची निर्मिती आहे.