अमेरिकेतील मराठी शाळा

591
प्रातिनिधिक फोटो

आकाशाला गवसणी घालण्यासाठी जमिनीपासून उंच उंच झेपावयास लागली की त्या झाडांच्या पारंब्या मात्र पुन्हा मुळाकडेच झेप घेतात ही वस्तुस्थिती आहे. माणसांचंही असचं होतं. मोठं होण्यासाठी, नावलौकिक आणि संपत्ती मिळवण्यासाठी माणसं आपल्या मुळांपासून शेकडो हजारो मैल दूर जातात आणि त्यांच्या मनातल्या पारंब्या मात्र पुन: पुन्हा त्यांच्या मुळाकडेच झेप घेत राहतात. आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती, भाषा त्यांना खुणावत राहतात अणि मग जिथे असतील तिथे आपापल्या आयडेंटिटीचं एक छोटं विश्व निर्माण करून जगतात. स्थलांतर करणाऱ्या प्रत्येक जमातीचं हे होतं. म्हणूनच मग चायना टाऊन, आमिशाव्हिलेज अणि लिटल इटली तयार होतात. हिंदुस्थानींच्या बाबतीत तर प्रत्येक प्रांताची वेगळी आस्मिता आपली प्रतिभा अणि प्रतिमा घेऊन उभी ठाकते. मराठी माणसंही यातून सुटलेली नाहीत.

संस्कृतीचा सर्वात मूलभूत घटक म्हणजे भाषा. भाषेमुळेच बाकीच्या संस्कृतीच्या बाबी प्रसारित होतात. परप्रांतात किंवा परदेशी गेल्यानंतर सर्वप्रथम आक्रमण होतं ते माणसाच्या भाषेवर. माणूस जिथे जातो तिथली भाषा त्याला तिथे जगण्यासाठी भले आत्मसात करावी लागत असेल, पण आपल्या घरात मात्र तो मातृभाषेतच बोलतो. आपल्या मुळांशी असलेलं हे कनेक्शन तो हट्टाने टिकवतो. मग मुलं होतात. घरात बोलली जाणारी भाषा ते सहज आत्मसात करतात. पण ती मोठी व्हायला लागतात अणि आजूबाजूला वेगळंच विश्व पाहतात. मग त्यांची शाळा, मित्र-मैत्रिणी अणि आजूबाजूची संस्कृती यांचं आक्रमण सुरू होतं अणि बाल्यावस्थेत घरात शिकलेली भाषा लोपू लागते.

गेल्या शतकातल्या सत्तरीच्या दशकात अमेरिकेतल्या मराठी माणसांना हा प्रश्न प्रखरतेने भेडसावू लागला. मग तिथे ठिकठिकाणी असलेल्या मंडळांमधून मराठी भाषा शिकवण्यासाठी तेथील स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले. पावसाळ्यातल्या मशरूमसारख्या मराठी शाळा सुरू झाल्या. आज अमेरिकेतल्या एकट्या न्यू जर्सी भागात चार मराठी शाळा आहेत. ‘खळाळत्या पोटोमॅकच्या दर्यात वाढलेल्या मुलांना गोदावरीच्या पाण्याची गोडीही कळावी’ म्हणून वॉशिंग्टन डी.सी.ची मराठी शाळा मॅरीलॅण्ड व व्र्हिजनिया या भागात सहा ठिकाणी चालते. बृहन्महाराष्ट्र मंडळ – नॉर्थ अमेरिका या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष नितीन जोशी सांगतात की अमेरिकेतल्या ५० राज्यांमध्ये एकंदरित ३२ मराठी शाळा आज कार्यरत आहेत.

सुरुवातीला एकमेकांच्या घरात साधेसोपे उच्चार शिकवण्यापासून हे वर्ग सुरू झाले. मराठीतला ‘औ’ हा उच्चार इंग्रजीतल्या ‘काऊ’मधल्या ‘ओडब्ल्यू’सारखा आहे अशी ही सुरुवात. मुलांचा उत्साह उदंड असतो. रॅलेह–नॉर्थ कॅरोलायना येथील मुलांच्या आग्रहाने तेथील विद्यामंदिर या शाळेने मराठी शब्द शिकवण्यासाठी अमेरिकन टेलिव्हिजनवरच्या ज्योपर्डी या खेळावरून शाळेसाठी एक खेळसुध्दा विकसित केला. सॅन डियागो येथील शाळेतील लहान मुलांनी योगीराज संत ज्ञानेश्वर ही नाटिका सादर केली.

डॅल्लास मराठी मंडळाच्या शाळेच्या संकेतस्थळावर याची माहिती मिळते. २००८ साली बीएमएमच्या पुढाकाराने सुनंदा टुमणे आणि विजया बापट यांनी अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने एक संयुक्त अभ्यासक्रम तयार केला. महाराष्ट्रातल्या भारती विद्यापीठाने त्याला मान्यता दिली. २००९च्या एप्रिल महिन्यात भारती विद्यापीठ आणि बीएमएम यांच्यात करार झाला. २०११ साली या अभ्यासक्रमांतर्गत पहिली मराठी भाषा परीक्षा झाली. आज बीएमएमच्या वतीने फिनिक्सच्या सोना भिडे हा कार्यक्रम पाहतात.

भौगोलिक आणि सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीमुळे माणसाच्या गरजा बदलत जातात. हिंदुस्थानातून परदेशी गेलेल्या मराठी माणसांना आपली संस्कृती आणि भाषेचा वारसा पुढच्या पिढीला देण्याची गरज भासली. बीएमएम आणि भारती विद्यापीठाच्या उपक्रमाने आज ती गरज एक स्ट्रक्चर्ड स्वरूप घेऊन मूर्तरूपी अवतरली. आता आपल्या मराठमोळ्या गणपती उत्सवाची ओळख अमेरिकेतल्या पुढच्या मराठी पिढीला गणेश चतुर्थी म्हणूनच होईल, द फॉर्थ ऑफ गणेशा म्हणून होणार नाही याची खात्री वाटते.

टोरोंटो मराठी शाळा

तीस वर्षांपूर्वी टोरोंटोमध्ये मराठी भाषा शिकवण्यासाठी क्लास सुरू झाला. परदेशात त्या ठिकाणी मराठी शिकणे गरजेचे आहे ही कल्पना तेथील शरद कावले यांची… त्यांनी मग श्रीराम मुलगुंड, आशा पावगी आणि मंदाताई टिळक यांच्या साथीने घरातल्या घरात मराठीचे क्लास सुरू केले. त्यानंतर मराठी भाषिक मंडळाच्या (एमबीएम) छत्राखाली येथील सगळ्या शाळा एकवटल्या. मंडळाने मग या शाळांसाठी जागा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांच्या पुस्तकांसाठी मंडळाने फंड उपलब्ध करून दिला. डॉ. माधव खांडकेकर हे १९९२ पर्यंत मंडळाचे मराठी शाळा को-ऑर्डिनेटर होते.

टोरोंटो मराठी शाळा

तीस वर्षांपूर्वी टोरोंटोमध्ये मराठी भाषा शिकवण्यासाठी क्लास सुरू झाला. परदेशात त्या ठिकाणी मराठी शिकणे गरजेचे आहे ही कल्पना तेथील शरद कावले यांची… त्यांनी मग श्रीराम मुलगुंड, आशा पावगी आणि मंदाताई टिळक यांच्या साथीने घरातल्या घरात मराठीचे क्लास सुरू केले. त्यानंतर मराठी भाषिक मंडळाच्या (एमबीएम) छत्राखाली येथील सगळ्या शाळा एकवटल्या. मंडळाने मग या शाळांसाठी जागा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांच्या पुस्तकांसाठी मंडळाने पंâड उपलब्ध करून दिला. डॉ. माधव खांडकेकर हे १९९२ पर्यंत मंडळाचे मराठी शाळा को-ऑर्डिनेटर होते.

त्रिवेणी मराठी शाळा, सिनसिनाटी

सिनसिनाटी ओएच येथील त्रिवेणी मराठी शाळेतही मराठी शिकवले जाते. बीएमएम मंडळच या शाळेला शिकविण्याचे साहित्य पुरवते. १३ सप्टेंबर २०१५ या दिवशी शाळेचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. येथे केवळ मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृतीचेही शिक्षण विद्याथ्र्यांना दिले जाते. येथे विद्याथ्र्यांकडून वर्षाला फक्त ५० डॉलर्स एवढीच माफक फी घेतली जाते. येथील कुणालाही मराठी शिकण्याची इच्छा असेल त्यांना तेथे प्रवेश दिला जातो. या शाळेची वेबसाईट अद्याप बनतेय. त्यामुळे त्या शाळेबद्दल जास्त माहिती मिळू शकत नाही.

अमेरिकेतील सॅन डियागो येथील ब्लॅक माऊंटेन रोडवर असलेल्या श्री मंदिर येथे ही मराठी शाळा भरते. येथे शिशू वर्गापासून पाचवीपर्यंत वर्ग भरतात. अमेरिकेतील असली तरी या शाळेत मराठी पुस्तकांची मोठी लायब्ररी आहे. यात भरपूर श्लोकही वाचायला मिळतात.

अमेरिकेतील मुलांना आपल्या मराठी संस्कृतीची, मराठी भाषेची ओळख व्हावी या कळकळीने येथील शिक्षक निरपेक्षपणे शिकवीत आहेत. दरवर्षी अभ्यासाशिवाय हस्ताक्षर स्पर्धा, पाठांतर स्पर्धा घेण्यात येतात . काही मुले हिंदुस्थानात गेली असतांना त्यांनी सावरकरांचे ‘जयोस्तुते’ हे गीत व ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ म्हणून दाखवले आणि शाबासकी मिळवली.

यंदाच लॉस एन्जेलीसला भरलेल्या बृ. म. मंडळाच्या अधिवेशनात स्टँडअप कॉमेडीमध्ये व स्टोरी टेलिंगमध्ये या शाळेच्या विद्याथ्र्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. यात त्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचाही वाटा मोठाच आहे. सर्वात कळस म्हणजे या शाळेच्या मुलांनी ‘योगीराज संत ज्ञानेश्वर’ ही नाटिका सादर करून वाहवा मिळविली. अमेरिकेत असूनही आपल्या मुलांवर मराठी संस्कार व्हावे व त्यांनी मराठी भाषा बोलता यावी, त्यांना ती समजावी यासाठी शाळेने बृ. म. मंडळ सुरु केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या