मराठी जलतरणपटूंचे यश, म्यानमार ते बांगलादेश दरम्यानची खाडी पोहून पार

61

सामना ऑनलाईन । उरण  (मधुकर ठाकूर)

उरण, वाशी, डोंबिवली येथील तीन शालेय अकरा वर्षीय हौसी जलतरण विद्यार्थ्यांनी म्यानमार ते बांगला देश दरम्याची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टीन आयलॅड चॅनेलची १७ किमी अंतराची खाडी पोहून पार केली आहे. राज संतोष पाटील (केगाव-उरण ),वेदांत विश्वनाथ सावंत (वाशी), डॉली देविदास पाटील (डोंबिवली-ठाणे) अशी या बहाद्दर मुलांची नावे आहेत. देशाचे नाव उज्वल करुन सातासमुद्रा पार पोहचविणाऱ्या या मुलांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

राज संतोष पाटील ( वय ११ , केगाव-उरण ) हा उरण येथील एनआय हायस्कुलचा विद्यार्थी आहे. वेदांत विश्वनाथ सावंत (वय -११, रा.वाशी) हा वाशी येथील फादर ऍग्लो शाळेचा तर डॉली देविदास पाटील (वय – १२ ,(रा.डोंबिवली-ठाणे) ही नेटिव्ह स्कुलची विद्यार्थीनी आहे. पोहण्याची आवड असलेल्या या हौशी जलतरण विद्यार्थ्यांनी याआधी मोरा-गेटवे आणि इतर खाडया यशस्वीरित्या पार केल्या आहेत.

मनोबल वाढलेल्या या विद्यार्थ्यांनी म्यानमार ते बांगला देश दरम्याची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टीन आयलॅड चॅनेलची १७ किमी अंतराची खाडी पोहून पार करण्याचा निश्चय केला.यासाठी जोरदार सरावाला सुरुवातही केली होती.त्यांना त्यांचे प्रशिक्षकांची उत्तम साथ लाभली होती. सरावानंतर पुर्ण तयारी झाल्यानंतर हे तीन हौशी जलतरणपट्टू बांगलादेशला रवाना झाले.त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी म्यानमार ते बांगला देश दरम्याची टेकनॅट जेट्टी ते सेंट मार्टीन आयलॅड चॅनेलची १७ किमी अंतराची खाडी यशस्वीरित्या पोहून पार केली आहे,अशी माहिती राज पाटील याचे प्रशिक्षक संतोष पाटील यांनी दिली. देशाचे नाव उज्वल करुन सातासमुद्रा पार पोहचविणाऱ्या या मुलांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी तीनही युवा जलतरणपट्टु मायदेशी परतणार असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या