मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण

174

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्ह्यातील, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालये आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. वासडी येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच फेरीही काढण्यात आली.

पिशोर : वासडी येथील स्वातंत्र्य सैनिक नेमीचंद पाटणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलो. सरपंच राहुल महावीर पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावात घंटागाडी फिरवून कचरा गोळा करण्यात आला. यावेळी उपस्थित उपसरपंच किसन आव्हाड, सदस्य भीमराव मुगले, अनिता रावसाहेब नागरे, रंजना सर्जेराव घुगे, रेखा दत्तू घुगे, भगवान नारायण घुगे, विठ्ठल प्रसादिक गणेश मंडळाचे अध्यक्ष रतनराव सोनवणे, बन्सीधर निकम, शाम चव्हाण व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

सावळदबारा : येथील जय कालिका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील प्राथमिक शाळेचे प्राचार्य नारायण कोलते यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढली. यावेळी प्राचार्य नारायण कोलते, व्ही.एस,राजपूत, आर.डी. टिकारे, व्ही. पी. पाटील, बी.वाय. खमाट, पी.डी. वैराळकर, जीवन कोलते, एस.टी. सोनावणे, गणेश मोहने, व्ही.के. जाधव, विशाल खडके, ए.जी. कोलते, एम. एन. व्यवहारे, एस.जी. राठोड, एम.एम. राऊत, बी. बी. ससाणे, अजबराव चव्हाण, श्याम जाधव, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. देव्हारी येथील संत सेवालाल महाराज माध्यमिक व मोलखेडा येथील जय भवानी उच्च माध्यमिक मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.

बालानगर : येथील केएमपी कॉलेज, स.भु. प्रशाला, केंद्रीय प्राथमिक शाळा व ग्रुप ग्रामपंचायत आदी ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य दत्तात्रय गोर्डे, भगवान गोर्डे, संजय गोर्डे, रवी गलदार, राहुल काळे, किशोर भुजबळ, गणेश गोर्डे, जाधव, मुख्याध्यापक, चाटुपळे, गायकवाड, ब्राह्मणकर, सावंत, तोटावार, बद्रिनाथ गोर्डे, संपतराव गोर्डे, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मुनावर, शिवाजी गोर्डे, शेख, मुख्याध्यापक कपटी, मुकडे, माने, कुंदे, शेळके, कुलकर्णी, सरपंच जबीर पठाण, सोपान भालेकर, ग्रामविकास अधिकारी जिजा मिसाळ, मच्छिंद्र गोर्डे, काकासाहेब घोंगडे, प्रवीण गोर्डे, अमोल गोर्डे, शेख शब्बीर, विठ्ठल ताकवाले, छबू शरणागत, शसेरे आदींसह विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.

उंडणगाव : येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शासकीय-निमशासकीय, विविध शाळा, आरोग्य केंद्र येथे ध्वजारोहण करण्यात आले. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कलाबाई आहिरे, सोसायटीत व्हाईस  चेअरमन दत्तात्रय सावळे, सावित्रीबाई फुले शाळेत अध्यक्ष अ‍ॅड. किरण नाईक, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक जगदीश जगताप, जी.एम. इंटरनॅशनल इंग्रजी शाळेत अजित पाटील, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाँ. अर्चना सपकाळ, रामकुंडवाडी येथील शाळेत सरला बोराडे, केंद्रीय प्राथमिक शाळेत एस. पी. सोनवणे, भावसिंगबाबा वस्ती शाळेत गणेश बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शिऊर : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त शिऊर ग्रामपंचायतीत सरपंच नितीन चुडीवाल, पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक बी.के. घुले, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. समीर पटेल, विविध कार्यकारी सेवा संस्थेत नानासाहेब साळुंके, बबन जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जवानांच्या हस्ते ध्वजारोहण

रवींद्र जाधव, योगेश जाधव, एकनाथ बारसे, श्रीहरी जाधव, पवन जाधव, दिनेश राऊत, गणेश जाधव या सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत डुकरे, शिवाजी मोरे, रवींद्र सूर्यवंशी, गोरख जगधने, शिवनाथ जाधव, वैâलास जाधव, भाऊसाहेब जाधव, रामदास जाधव, मारâती जाधव आदींची उपस्थिती होती.

वैजापूर : विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नालेगाव मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्षा ज्योती सुरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. एम. हजारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  सरपंच मधुकर शिंदे, संचालक दत्तात्रय सुरासे, राजू सातपुते, माजी सरपंच अशोक  काकडे, माजी सरपंच कारभारी जठार, उपसरपंच रमेश त्रिभुवन, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र  काकडे, ज्ञानेश्वर ठाले, आप्पासाहेब सोनवणे, कारभारी त्रिभुवन, मुख्याध्यापिका  वाढे  यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी भरत निंबाळकर, सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रवीण जाधव, प्रमोद रिंढे, त्र्यंबक गावडे, मनीषा उभेदळ, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, भारत भोपळे, सुनील सपकाळ, योगेश बोरुडे, युवराज काकडे, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, सुनील बोडखे, किशोर साळुंके, ज्ञानदेव तायडे, अमोल त्रिभुवन आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रमोद पठारे तर आभार प्रमोद रिंढे यांनी मानले.

नाचनवेल : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेसह विविध शासकीय कार्यालयांत ध्वजारोहण करण्यात आले. येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत ग्रामपंचायत समिती सदस्य पंडित थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाय.आर. जाधव, व्ही. एच. शिंदे, रामदास निकम, देवचंद राजपूत, के.के. थोरात, पी. एस. शिंदे, विलास थोरात आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

रहिमाबाद : येथे विविध ठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शाखा अधिकारी गोपीनाथ काटोले, ग्रामसंसदेच्या आवारात ग्रामविकास अधिकारी एस.टी. वाघ, केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक टी. एस. राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी येथील सरपंच अंकुश पाटील व संजय डमाले यांनी मुक्तिसंग्राममध्ये मराठवाड्यातील ‘स्वामी रामानंद तीर्थ ते गोविंदभाई श्रॉफ यांनी केलेले कार्य व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पोलीसपाटील विलास चिंचपुरे, शालेय कमिटीचे उपाध्यक्ष गंगाधर सिरसाट, माजी सरपंच दादा नवल, तलाठी दीपाली जाधव, ईश्वर उबाळे, हरिभाऊ बोडखे, भानुदास लहाने, एस. टी. दौड, जी. बी. जगताप, एस. एस. कांबळे, बी.एस. तायडे, जी.बी. चौधरी, एस.एन. गाडेकर, एस. एस. भालशंकर, अनिल पोघे, व्ही.एस. समिंद्रे, डी. व्ही. शिंदे, यू. व्ही. गाढवे, ए.आर. पाटील, जी.एल. वाघ व हरणे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

विहामांडवा : हिरडपुरीच्या लिटल स्टार स्वूâलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी असमान आबा खनपट, इसाक, दिगंबर नाटकर, मुश्ताक पटेल, मुख्याध्यापिका कावेरी चौधरी, मीरा खनपट, राधा नरवडे, पूजा कासलीवाल, पालक आदींची उपस्थिती होती.

विहामांडवा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्याध्यापक  रायभान गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पूनम हाकम या विद्यार्थिनीने मराठवाडा गौरव गीत म्हटले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी अनिल पुदाट यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाऊसाहेब थोटे, राजेंद्र हुंडीवाले, नारायण मिसाळ हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र पुâलशंकर, तर आभार भागचंद बडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम घोलप, विष्णू बडे, अमोल बडे, रूपाली गायकवाड, सत्यशीला सानप, सुप्रिया नरवडे, कोंडेकर, राजू कुलभय्या यांनी परिश्रम घेतले.

वसई जि.प. शाळेत मुक्तिसंग्रामदिन

वसई : येथील जि.प. शाळेत मुक्तिसंग्रामदिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ग्रामसंसद कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच सुनील सावळकर यांनी केले, तर जि.प. शाळेत मुख्याध्यापक आराक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक यांनी मुक्तिसंग्रामदिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटील संजय वाघ यांनी मुक्तिसंग्राममध्ये गावातील किती व्यक्ती होत्या, तसेच ज्येष्ठ नागरिक बोरमळे यांनी मुक्तिसंग्राम तसेच आणीबाणीच्या काळात गावातील किती लोकांचा सहभाग होता. याबद्दल माहिती दिली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक पाटील, पायघोन, भागवत, शेळके, गव्हाणे, शिक्षिका मगरे, थोरात, बिबे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या