‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले

358

सामना ऑनलाईन, साओ पाओलो

ख्रिश्चन धर्मगुरू मार्सेलो रॉसी हे जगभरात प्रसिद्ध नाव आहे. त्यांचा एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आपल्या भक्तांशी संवाद साधत असताना रॉसी यांनी जाड्या मुली स्वर्गात जात नाही असं विधान केलं होतं. त्यांनी हे विधान केल्यानंतर एक जाडजूड महिला त्यांच्यामागून आली आणि तिने रॉसी यांना स्टेजवरून ढकलून दिलं.

रॉसी हे जवळपास 50 हजार भक्तांना संबोधित करत होते. रॉसींना ढकलून दिल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. रॉसी यांच्या गुडघ्याला मार लागला असून त्यांनी जमिनीवर पडल्यानंतर लगेच स्वत:ला सावरत मी ठीक आहे असं सगळ्यांना सांगितलं. या महिलेने त्यांना त्यांच्या विधानामुळे संतापून धक्का दिला की अन्य काही कारणामुळे हे स्पष्ट झालेलं नाहीये. ज्या महिलेने त्यांना धक्का दिला ती मनोरुग्ण असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या