शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी उद्या 30 ऑगस्टला मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि घेराव घालण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षक/शिक्षकेतर सेनेच्या वतीने शेकडो शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.
मुंबई महानगरपालिका शिक्षक/शिक्षकेतर सेना अध्यक्ष के. पी. नाईक, मुख्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. महानगरपालिका खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करावी. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.सी.-1 योजना सुरू करावी.
विमा योजना लागू करण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Grant In code तत्काळ लागू करावे, खासगी अनुदानित प्राथमिक शाळांसाठी अनुदान द्यावे, महानगरपालिका खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना फॉर्म नं. 2 दिला जावा, खासगी अनुदानित शाळांची मान्यतेपूर्वीची रिकव्हरी न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
अन्य काही मागण्या…
खासगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना 27 टक्के देय देणे.
खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना विना विलंब परवानगी द्यावी.
मे 2008 रोजी नियुक्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी.
खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील सन 2015 पासून कार्यरत असणाऱ्या टी.ई.टी. शिक्षकांना कर्मचारी संकेतांक द्यावा.
मे 2008 नंतर महानगरपालिका सेवेत कामाला लागलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षक कर्मचाऱ्यांचे दावे काही कारणांमुळे प्रलंबित असल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम तत्काळ द्यावी.
शिक्षक कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वेतन वृद्धीची आश्वासित योजना लागू करावी.