जगातील सर्वाधिक श्रीमंत कोण, याची चर्चा नेहमीच होत असते. तसेच दरवर्षी याबाबतची यादीही प्रसिद्ध होत असते. या यादीत हिंदुस्थानातील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचेही नाव होते. मात्र, हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी यांच्या संपत्तीत घट झालेली दिसली. तर जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क अजूनही अव्वल आहेत. तर 2024 या वर्षात सर्वाधिक संपत्ती मेटाच्या मार्क झुकेरबर्गने कमावली आहे.
मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मेटाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने झुकेरबर्ग यांची संपत्तीही वाढत आहे. या वर्षात झुकेरबर्गने सर्वाधिक संपत्ती कमावली असली तरी श्रीमंतांच्या यांदीत टेस्लाचे एलॉन मस्कच अव्वल आहेत. एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 231 अब्ज डॉलर आहे. मस्क गेल्या 4 वर्षात तीनवेळा पहिल्या क्रमांकावर आहे. 2024 मध्येही त्यांनी अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
एलॉन मस्कनंतर जेफ बेझोस यांचा श्रीमंतांच्या यादीत जगात दुसरा क्रमांक लागतो. जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत. ॲमेझॉनच्या क्लाउड कॉम्प्युटिंग या कंपनीनं चांगली कामगिरी केलीय. त्यामुळं जेफ बेझोस यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 57 टक्क्यांची वाढ झालीय. सर्वाधिक संपत्ती असणाऱ्यांच्या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट हे तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 175 अब्ज डॉलर आहे.
या वर्षात मार्क झुकरबर्गने सर्वाधिक संपत्ती कमावली असली तरी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मार्क झुकरबर्गचा चौथा क्रमांक लागतो. झुकरबर्गची एकूण संपत्ती ही 158 अब्ज डॉलर आहे. वॉरेन बफेट यांचेही नावही श्रीमंतांच्या यादीत आहे. बफेट हे प्रसिद्ध मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 144 अब्ज डॉलर आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.