मार्क झुकेरबर्ग होणार दुसऱ्यांदा बाबा

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी एक गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. ती बातमी फेसबुक संदर्भात नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. मी दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे त्यांनी अधिकृत फेसबुक पेजवर जाहीर केले आहे. झुकेरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला यांना मॅक्स नावाची मुलगी आहे.

पत्नी प्रिसिला आणि मी फार खुश असून आम्हाला अजून एक मुलगी व्हावी अशी आमची इच्छा असल्याचे झुकेरबर्ग यांनी फेसबुकवर म्हटल आहे. आम्ही दुसऱया बाळाचा विचार करु असे कधी वाटले नव्हते. पण जेव्हा मला प्रिसिला पुन्हा गरोदर असल्याचे समजले तेव्हा मला खूप आनंद झाला. पण माझ्या मनात पहिला विचार बाळ तंदुरुस्त असाव असा आला. तसेच हे दुसरे अपत्यही मुलगीच असावी असे वाटल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. झुकेरबर्ग दुसऱयांदा बाबा होणार असल्याच समजताच त्याच्या करोडो चाहत्यांनी सोशल साईटवरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

आपली प्रतिक्रिया द्या