कुरुंद्यात हुंडाबळी, सासरच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

131

सामना प्रतिनिधी । वसमत

तालुक्यातील कुरुंदा येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ज्योती अमोल दळवी (27) या विवाहितेस पतीसह सासरची मंडळी मोटरसायकल घेण्याकरिता माहेराहून वडीलांकडुन 1 लाख रूपये घेऊन ये असा तगदा लावत होती. मात्र, माहेराहुन पैसे आणू शकत नसल्याने तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळुन ज्योती दळवी या विवाहितेने 20 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश देशमुख तत्काळ घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. याप्रकरणी सासु अरूणा दळवी, सासरा सुलभाजी दळवी, नवरा अमोल दळवी व नणंद सुरेखा या पाच जणांविरोधात महादु परसराम भुतकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार नेटके हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या