पिछे देखो पिछे… न्यूझीलंडचा गुप्टिल झाला विचित्र पद्धतीने बाद

सामना ऑनलाईन । बर्मिघम

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टिल विचित्र पद्धतीने बाद झाला. आफ्रिकेचा वेगवाग गोलंदाज आंदिले फेहुक्वायोच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारायच्या नादात मार्टिन गुप्टिलचे संतुलन बिघडले आणि तो हिट विकेट झाला. क्षणभर कोणालाही काही कळाले नाही. परंतु त्यानंतर हे लक्षात येताच आफ्रिकेच्या खेळाडूंनी जल्लोष केला.

martin-guptil

न्यूझीलंडच्या डावातील 15 वे षटक आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंदिले फेहुक्वायो गोलंदाजी करत होता. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याच्या नादात मार्टिन गुप्टिलचे संतुलन बिघडले आणि त्याचा पाय यष्ट्यांना लागला. इकडे क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी त्यामागे धावत होता, तर यष्टीरक्षक विरोधी संघाची विकेट मिळाल्याने नाचत होता. काहीकाळ नक्की काय घडले हे कोणाला समजले नाही. समालोचकही अचंबित झाले. बाद होण्यापूर्वी गुप्टिलने 59 चेंडूत 35 धावा केल्या.