उडता गुप्टिल! पाकिस्तानविरुद्ध घेतला अफलातून झेल, तुम्ही पाहिला का?

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

बर्मिंघमच्या लढतीत न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. या लढतीत पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमान-उल-हक याचा मार्टिन गुप्टिल याने अफलातून झेल घेतला आणि त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला. या झेलचे नेटिझन्सने कौतुक केले आहे.

पाकिस्तानच्या डावाच्या 11 व्या षटकात फर्ग्यूसनच्या 141 किमी. वेगाच्या चेंडूचा इमान-उल-हकला पत्ताच लागला नाही. उसळी घेऊन आलेला चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली. चेंडू पॉइंटच्या बाजूला उंच गेला. जमिनीवर पडण्यापूर्वी मार्टिन गुप्टिल वेगाने आला आणि हवेत सूर मारून त्याने चेंडू झेलला. झेल घेतलाना मार्टिन गुप्टिल अक्षरश: सुपरमॅनप्रमाणे हवेत होता. त्याच्या या झेलमुळे इमान-उल-हकची 19 धावांची खेळी संपुष्टात आली.