शहीदाची पत्नी बनली ‘मिसेस इंडिया’

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी सैन्याच्या माजी कॅप्टन शालिनी सिंह यांना नुकताच मिसेस इंडिया क्लासिक क्वीन ऑफ सबस्टन्स २०१७ चा मुकुट मिळाला आहे. शालिनी या मेजर अविनाश सिंह भदौरिया यांच्या पत्नी आहेत. कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना २८ डिसेंबर २००१ रोजी मेजर भदौरिया शहीद झाले होते. त्यावेळी अवघ्या २३ वर्षांच्या असलेल्या शालिनी यांनी दोन वर्षांच्या मुलाला सोडून सैनिकी प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या.

mrs-india

प्रशिक्षणानंतर निवड होऊन तब्बल सहा वर्षं त्यांनी हिंदुस्थानी लष्कराची सेवा केली. त्यामुळे मिसेस इंडियाचा बहुमान पटकवणाऱ्या त्या पहिल्या महिला सैनिक ठरल्या आहेत. शालिनी उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण कानपूरमध्ये झाले. एमए प्रथम वर्षाला असताना पतीचे निधन झाले. यानंतर शिक्षण सोडावे लागले. नोकरीदरम्यान २००७ मध्ये एमबीए केले. शालिनी सध्या एका कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. गरीब व दिव्यांग मुलांच्या शिक्षणात त्या मदत करतात. त्यांचा मुलगा ध्रुव आता १७ वर्षांचा असून त्यालाही सैन्यात दाखल व्हायचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या