
मार्व्हल सिनेमाचा नवा चित्रपट थॉर लव्ह अँड थंडरचा नवा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या ख्रिश्चियन बालचा ‘गॉर द गॉड बुचर’ची पहिली झलक पाहायला मिळाली आहे.
थॉरची प्रेयसी असलेल्या जेन फॉस्टर हिचा सुपरहिरो अवतारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तिच्या ताकदीची झलकही या नव्या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे.
याशिवाय प्रसिद्ध अभिनेता रसेल क्रो हा झ्यूस या देवतेची भूमिका साकारणार आहे. त्याचे पात्रही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
नवा ट्रेलर प्रसिद्ध झाल्याच्या एका तासाच्या आत तो 3 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.