ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला परवानगी

337

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतणीने लिहिलेल्या ‘टू मच एंड नेवर इनफ हाउ माय फैमिली क्रिएट द वर्ल्ड मोस्ट डेंजरस मैन’ या वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला आणि प्रचाराला अमेरिकेच्या एका न्यायालयाने परवानगी दिली आहे. ट्रम्प यांची पुतणी मेरी ट्रम्प हिने लिहिलेले हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या भावानेच या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध दर्शवला होता. पण मेरी ट्रम्प यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपल्या पुस्तकाच्या प्रचाराची परवानगी मिळवली आहे. या पुस्तकाच्या बऱयाच प्रति वाचकांच्या हातात पडल्या आहेत त्यामुळे त्यावर बंदी घालणे योग्य ठरणार नसल्याचे न्यूयॉर्कच्या पुफेकीसी स्टेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हॉल बी ग्रीनवल्ड यांनी म्हटले आहे. न्यायालयाने यासंदर्भात ट्रम्प यांचे भाऊ रॉबर्ट ट्रम्प यांची याचिका फेटाळली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या