कुरकुरीत मसाला पुरी

साहित्य दोन वाटय़ा तांदळाची पिठी, दोन चमचा बेसनाचे पीठ,एक चमचा भाजलेली उडदाची डाळ, एक चमचा खरपूस भाजलेली चणा/हरबरा डाळ, एक चमचा भिजवलेली चणा डाळ, एक चमचा भाजून भरड वाटलेले तीळ, दहा-बारा कढीपत्त्याची पाने, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ, हिंग, तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.

कृती एक तास अगोदर चणा डाळ भिजत घालून ठेवा आणि एक तासानंतर चाळणीवर निथळून घ्या आणि बाजूला ठेवा. चणा-उडदाची डाळ खरपूस भाजून ठेवा. तीळ भाजून व मिक्सरवर भरड वाटून घ्या, भाजलेली चणा -उडदाच्या डाळीची मिक्सरवर पावडर करून घ्या. त्यानंतर एका मोठय़ा भांडय़ात तांदळाची पिठी, बेसनाचे पीठ,चणा -उडीद डाळीची पिठे, तिळाचे भरड कूट, भिजवलेली चणा डाळ, लाल मिरचीचे तिखट, मीठ, हिंग आणि पातळ केलेले बटर घालून कोरडेच एकत्र करून नंतर थोडे थोडे पाणी घालत पीठ भिजवून मुरत ठेवा. दहा मिनिटांनी त्याचे लिंबाएवढे गोळे बनवून ठेवा. एका कढईत तेल गरम करा. पोळपाटावर एक पातळ ओले सूती कापड पसरून त्यावर एकेक गोळा ठेवून हाताच्या बोटांनी हळूहळू दाबत गोलाकार आकाराच्या  पातळ पुऱया बनवा. या पुऱया कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या