
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. आगीची माहिती मिळताच हिमाचल अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.
मनालीतील रंगरी परिसरातील संध्या हॉटेलला सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले आणि संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी गेले. अद्याप आगीत कुणी जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही.