चिनी वायुदलाच्या हालचालींमध्ये वाढ

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चीन हिंदुस्थानवर युद्ध लादण्यासाठी मागील ३-४ महिन्यांपासून तयारी करत आहे. तिबेट जवळच्या चिनी विमानतळांवर सध्या ४८ लढाऊ विमानांचा ताफा सज्ज आहे. यात सुखोई-२७चे आधुनिक रुप असलेली जे-११ विमानांचा मोठा ताफा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेट जवळच्या चिनी विमानतळांवर सध्या २० ते २५ जे-११ विमानांचा ताफा आहे.

चीन युद्धासाठी सज्ज करतोय रक्ताचा मोठा साठा

यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान तिबेट आणि आसपासच्या परिसरात चिनी लढाऊ विमानांनी ७०० पेक्षा जास्त वेळा फेऱ्या (सॉर्टी) केल्या आहेत. महिन्याला सरासरी १०० सॉर्टी झाल्या आहेत. चीनच्या टीयू-१५४ या टेहळणी करणाऱ्या विमानाने तिबेट आणि आसपासच्या परिसरात मागील काही आठवड्यात वारंवार फेऱ्या मारल्या आहेत. सर्व प्रकारच्या विमानांचा विचार केल्यास तिबेट आणि आसपासच्या परिसरात चिनी विमानांनी यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान १,३०२ फेऱ्या (सॉर्टी) केल्या आहेत.

चिनी वायुदलाच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या वायुदलानेही हिंदुस्थान-चीन सीमेजवळच्या विमानतळांवरील लढाऊ विमानांच्या संख्येत वाढ केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या