पुणे-गुजरात राजकोटमध्ये भिडणार

22

सामना ऑनलाईन,राजकोट

रायझिंग पुणे सुपरजायंट आणि गुजरात लायन्स हे ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानी असलेले तळाचे दोन संघ उद्या एकमेकांना भिडणार आहे. लागोपाठच्या तीन पराभवांमुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या गुजरातच्या गोटात अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या पुनरागमनामुळे जोश आला आहे. त्यामुळे पुणे संघाविरुद्ध उद्या गुणांचे खाते उघडण्याचा त्यांचा इरादा असेल. पुणे संघाच्या उद्घाटनाच्या लढतीत घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला धूळ चारून ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्राची धडाकेबाज सुरुवात केली. मात्र त्यानंतर पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे उद्या सुरेश रैनाच्या गुजरातविरुद्ध स्टीव्हन स्मिथच्या पुणे संघाची कसोटी लागणार आहे. उभय संघ आपली गाडी विजयाच्या रुळावर आणण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावतील.

आपली प्रतिक्रिया द्या