हरित लवादाच्या निर्णय विरोधात माथेरान बंद!पर्यटकांचे हाल, संघर्ष समिती कोर्टात जाणार

 सामना ऑनलाईन । कर्जत 

हरित लवादाने  अनधिकृत बांधकामांवरील  कारवाईचे आदेश दिल्यानंतर माथेरान मधील अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु अाहेत. अनधिकृत बांधकामांनरील कारवाई रोखण्यासाठी आज सोमवारी (३० जानेवारी) सर्वपक्षीय संघर्ष समितीने माथेरान बंदचा नारा दिला होता. .माथेरान  बंद मुळे बऱ्याच पर्यटकांचे हाल झाले. नेरळ माथेरान टॅक्सी युनियनने सुद्धा या बंद ला पाठिंबा दिल्याने संध्याकाळ पर्यंत नेरळ – माथेरान टॅक्सी सेवा बंद असल्याने शनिवार रविवारी माथेरानला गेलेल्या पर्यटकांना चार पाच तास बसची वाट बघत बसून  प्रवासाचा त्रास सहन करावा लागला. स्थानिक व्यावसायीक, घोडेवाले, हातरिक्षा, मोठे हॉटेल्स, लॉजिंग, टपरीधारक बंद मध्ये सहभागी झाले होते.

माथेरान मध्ये एकूण १०६५  मिळकती आहेत त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के म्हणजे आठशे लोकांना नगरपालिकेने नोटिसा दिल्या आहेत. २००३ साली माथेरान इको सेन्सएटिव्ह झोन जाहीर झाल्यानंतर जेव्हढी अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्या सगळ्यांना अनधिकृत बांधकामे पाडावीत अशानोटिसा आल्या आहेत. बॉम्बे इन्व्हरमेन्ट ग्रुपने हरित लवाद न्यायालयात एक याचिका दाखल करून माथेरान मधील पर्यावरण ह्रास होत असून येथे बऱ्याच प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याचे मत  मांडले होते. २००३ सालानंतर इकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर झाल्यानंतर  जी बांधकामे झाली  आहेत ती पर्यावरणाला घातक आहेत म्हणून ती पाडण्यात यावी, असे म्हणणे त्यांनी लवादात मांडले होते. त्यानंतर १० जानेवारीला हरित लवादाने सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने तोडावी, असा निर्णय दिला आहे.

माथेरान मधील भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम माथेरान वर उमटणार आहेत. आता पर्यंत इको झोन आणि आता हरित लवादाच्या निर्णय यामुळे माथेरान मधील स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्व धोक्यात आल्याचे या माथेरान मधील या संकटाचा  मुकाबला करण्यासाठी सर्व माथेरानकर आपापले पक्ष संघटना बाजूला ठेऊन माथेरानकर या एकाच भावनेतून एकत्र आले आहेत. या लढ्याचा भाग म्हणून आज  माथेरान बंद ठेवण्यात  आले होते.  ज्या इको झोन अधिसूचने मुळे  माथेरानच्या भूमी पुत्रांच्या आणि माथेरानच्या विकासात अडचण निर्माण झाली आहे त्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून हरित लवादाच्या निर्णयाला  न्यायालयात  आव्हान देणार असल्याचे या संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले .

माथेरान मध्ये गावठाण प्लॉटच उपलब्ध नाहीत.  केवळ माथेरान बंगलो प्लॉट आणि बाजार प्लॉट आहेत. हे सर्व प्लॉट शासनाने भाडे करारावर माथेरानमधील नागरिक आणि हॉटेल्सवाल्याना दिलेले  आहेत. १९३८ सालानंतर कोणालाही शासनाने आज पर्येंत कोणताच प्लॉट वाढीव अथवा नवीन दिलेला नाही.

सद्या माथेरानकरांची दुसरी तिसरी पिढी येथे वास्तव्य करीत आहे. जी बांधकामे आम्ही वाढवली आहेत ती दिलेल्या प्लॉट मधेच वाढवली आहेत ते पण केवळ कुटुंब वाढल्यामुळे आम्ही ती बांधकामे वाढवली आहेत कुटुंबाची आजची गरज आणि घरातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे एक दोन रूम आम्ही वाढवले आहेत, असे या नागरिकांचे म्हणणे आहे.

सोमवारच्या माथेरान बंदॉला नेरळ माथेरान टॅक्सी संघटनांनी पाठिंबा दिला होता. या बंद मुळे पर्यटकांचे हाल झाले ज्या पर्यटकांना बंद आहे हे माहित नव्हते त्यांना नेरळ वरून वर जाण्यासाठी कोणतेही प्रवासाचे साधन मिळाले नाही.  जेपर्यटकखासगी वाहन घेऊन आले होते, त्यांचे खाण्यापिण्याचे व राहण्याचे हाल झाले.

आपली प्रतिक्रिया द्या