हरित लवादाच्या निर्णय विरोधात एकटवले सर्व माथेरानकर

38

सामना ऑनलाईन । माथेरान

हरित लवादाच्या अनधिकृत बांधकामांवरील  कारवाईच्या आदेशानंतर माथेरान मधील हि बांधकामे पडण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरु असून हि कारवाई रोखण्यासाठी ३० जानेवारी रोजी माथेरान बंद चा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिला आहे. हरित लवादाने दिलेल्या निर्णय ला स्थगिती देण्यास शासनाने असमर्थता व्यक्त केल्या नंतर माथेरानकरांनी हे संघर्षाचे हत्यार उपसले आहे. हरित लवादाने माथेरान मधील दिलेल्या या निर्णयासंदर्भात माथेरानकरांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी आज बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
माथेरान मधील भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे या निर्णयाचे दूरगामी परिणाम माथेरान वर उमटणार आहे . आता पर्यंत इको झोन आणि आता हरित लवादाच्या निर्णय यामुळे माथेरान मधील स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्व धोक्यात आल्याचे या  पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत ,उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, भाजपाचे शहराध्यक्ष विलास पाटील , शिव सेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज खेडकर,  स्वाभिमानाचे सागर पाटील उपस्थित होते.

माथेरान मधील या संकटाचा  मुकाबला करण्यासाठी सर्व माथेरानकर आपापले पक्ष संघटना बाजूला ठेऊन माथेरानकर या एकाच भावनेतून लढतील. या लढ्याचा भाग म्हणून ३० तीस जानेवारीला माथेरान बंद ठेवण्यात  ठेवण्यात येणार आहे. मात्र प्रशासनाने त्यापूर्वी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास माथेरान बेमुदत काळासाठी बंद करण्याचा निर्णय या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

ज्या इको झोन अधिसूचने मुळे  माथेरानच्या भूमी पुत्रांच्या आणि माथेरानच्या विकासात अडचण निर्माण झाली आहे त्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून हरित लवादाच्या निर्णयाला  न्यायालयात  आव्हान देणार असल्याचे या संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यासंघर्ष समिती मध्ये माथेरान मधील सर्वपक्षीय प्रमुखांचा समावेश आहे .

आपली प्रतिक्रिया द्या