संकटातल्या नरेंद्रना हवीय योगींकडून मदत

27

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना होळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्याचं उभं पिक कापून टाकण्यात आले आहे. बरसानेमधील ही धक्कादायक घटना आहे. बरसानेची होळी जगप्रसिद्ध आहे. या होळीसाठी मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बरसानेमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. याच तयारीचा फटका बरसानेचे शेतकरी नरेंद्र कुमार भारद्वाज यांना बसलाय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठ नरेंद्र यांच्या शेतामध्ये हेलिपॅड करण्यात आलेय. या हेलिपॅडसाठी नरेंद्र यांच्या शेतामधील उभे पिक कापून टाकण्यात आले आहे. नरेंद्र यांनी या पिकासाठी ६० हजार रुपये खर्च केला होता. शेती हेच त्यांच्या उदारनिर्वाहाचे साधन होते. आता प्रशासनाने या पिकावर वरवंटा फिरवल्याने त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय.

मुलीचं लग्न कसं करणार ?
विशेष म्हणजे नरेंद्र यांच्या मुलीचे लग्न एप्रिल महिन्यात होतेय. पिक नष्ट झाल्याने आता मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करायाचा ? असा प्रश्न या वधूपित्याला पडलाय. प्रशासनाकडूनही त्यांना योग्य उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीच याबाबत काहीतरी मदत करतील अशी अपेक्षा नरेंद्र यांनी व्यक्त केलीय.

आपली प्रतिक्रिया द्या