कृष्णजन्मभूमी प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग

court

-श्रीकृष्ण जन्मभूमी वादाशी संबंधित सर्व खटल्यांची सुनावणी आता अलाहाबाद उच्च न्यायालयात होणार आहे. मथुरा येथील कनिष्ठ न्यायालयात सध्या सुरू असलेली प्रकरणे उच्च न्यायालयानं स्वतःकडे वर्ग केली आहेत.

मथुरा जिल्हा न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत ज्या जमिनीवर शाही मशीद इदगाह बांधली आहे त्या जागेवर हिंदू भाविकांनी हक्क सांगितला आहे, या खटल्याच्या हस्तांतरणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने 3 मे रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

मथुरेतील कृष्णजन्मभूमी प्रकरणाला राष्ट्रीय महत्त्व असून त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी व्हायला हवी, असं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.

ही याचिका कटरा केशव देव खेवत मथुरा येथील भगवान श्री कृष्ण विराजमान यांनी रंजना अग्निहोत्री आणि इतर सात जणांमार्फत आणि प्रतिवादींच्या वकिलामार्फत दाखल केली होती.

या प्रकरणातील प्रतिवादी आहेत – कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही मशीद इदगाहची व्यवस्थापन समिती, श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट, कटरा केशव देव, डीग गेट, मथुरा आणि श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्था, कटरा केशव देव, डीग गेट, मथुरा.

अर्जदारांनी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्यासमोर इदगाह मशिदीवर हिंदू समाजाचा हक्क सांगण्यासाठी आणि मनाई आदेशासाठी दिवाणी दावा दाखल केला होता आणि असे नमूद केलं होतं की ती हिंदू मंदिरे पाडल्यानंतर बांधली गेली होती आणि असं बांधकाम मशीद असू शकत नाही कारण वक्फनं हे कधीच तयार केलं नव्हतं. ही जमीन कधीही मशिदीच्या बांधकामासाठी समर्पित करण्यात आली नव्हती, असं याचिकेत म्हटलं आहे.