मास्कशिवाय फिरणाऱ्य़ांकडून कुर्ला, माटुंग्यात 74 हजारांचा दंड वसूल

297

मास्क न घालता फिरणाऱयांवर पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली असून कुर्ला, माटुंग्यात एकूण 74 जणांकडून प्रत्येक एक हजार याप्रामाणे 74 हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असताना अनेकजण बेजबाबदारपणे मास्क न घालता फिरत असल्याने कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास एक हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेऊन कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानुसार गेल्या चार दिवसांत माटुंगा, वडाळ्यात 30 तर कुर्ला परिसरात 44 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. माटुंगा परिसरात कोरोनामुळे आतापर्यंत 250 तर कुर्ला भागात 200 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी संबंधित भागात पालिकेकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या