मोठी बातमी – तबलिगीचे सर्वेसर्वा मौलाना साद ‘इथे’ लपलेत, तपास यंत्रणा सतर्क

6226

तबलीगी जमात मौलाना मोहम्मद साद सध्या फरार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा त्यांचा तपास करत आहेत. अशातच मौलाना साद हे जाकिर नगर येथे लपले असल्याची माहिती तपास यंत्रणांना लागली आहे. असे असले तरी चौदा दिवसांचा क्वारंटाईन पिरेड संपल्यानंतर या भागांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान तपास यंत्रणा बुधवारी पुन्हा एकदा तबलिगी जमातच्या कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. यावेळी महिला अधिकाऱ्यांचा देखील या टीममध्ये सहभाग होता. या कार्यक्रमाची कार्यक्रम स्थळाची बराच काळ तपासणी सुरू होती. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक पोलिसांच्या देखील समावेश करण्यात आला होता.

दिल्लीतच नव्हे तर देशामध्ये कोरोनाव्हायरस पसरण्यात तबलिगी जमातच्या लोकांच्या कळत नकळत सहभाग होता तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 669 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच येथून बाहेर गेलेले लोक यांच्या संपर्कात आले अशांपैकी अनेकांचे रिझल्ट रिपोर्ट पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे तबलिगी जमात मौलाना साद यांच्याविरोधात 31 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मौलाना साद हे कुठे लपून बसले आहेत याचा तपास यंत्रणा सातत्याने शोध घेत आहेत. उत्तर प्रदेश मध्ये शामली येथे त्यांचे निवासस्थान आहे. तिथून ते त्यांचे सासर असलेले सहारनपुर येथेदेखील पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी धडक देऊन चौकशी केली आहे. मात्र त्यांना पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. आता जाकिर नगर मध्ये ते लपले असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. एका नातेवाईकाच्या घरी ते लपले असल्याची माहिती आहे. म्हणूनच या विभागातील सुरक्षा अधिक करण्यात आली असून क्वारंटाईन पिरेड संपण्याची वाट तपास यंत्रणा बघत आहेत. यानंतर चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्यात येईल. तसेच ते या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी गेले तेथील लोकांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल. दरम्यान मौलाना साद यांच्यासोबतच असणारे तबलिगी जमातचे अन्य सहा लोक कुठे आहेत याची मात्र माहिती अद्याप मिळालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या